प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव:महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे उद्या दिनांक २४ सप्टेंबर रोजी सोलापूर व धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
दौऱ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –
सकाळी ८:०० वाजता उपमुख्यमंत्री ठाणे निवासस्थान येथून मुंबई विमानतळाकडे प्रयाण करतील.
सकाळी ८:३० वाजता मुंबई विमानतळावरून सोलापूरकडे प्रयाण करून सकाळी ९:१५ वाजता सोलापूर विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर हेलिकॉप्टरने धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथे रवाना होतील.
सकाळी ९:५५ वाजता परंडा हेलिपॅडवर आगमन होईल.
सकाळी १०:०० वाजता परांडा तालुक्यातील रुई गावात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करतील.
दुपारी १२:०० वाजता भूम तालुक्यातील पाथरूड येथील पुरग्रस्त भागांचा आढावा घेतील.
दुपारी २:०० वाजता कळंब तालुक्यातील आथर्डी परिसरातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून पाहणी करतील.
त्यानंतर सायंकाळी ४:०० वाजता मोटारीने कळंब हेलिपॅडकडे प्रयाण करतील व ४:३० वाजता हेलिकॉप्टरने सोलापूरकडे रवाना होतील.
सायंकाळी ५:०० वाजता सोलापूर विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण होईल.
सायंकाळी ५:४५ वाजता मुंबई विमानतळावर आगमन होईल व मोटारीने ठाणे निवासस्थान.
सायंकाळी ६:१५ वाजता उपमुख्यमंत्री ठाणे निवासस्थान येथे परत येतील.
या दौऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदे प्रत्यक्ष अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून मदतीच्या उपाययोजनांचा आढावा घेणार असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये त्यांच्या दौऱ्याबद्दल उत्सुकता आहे.
0 टिप्पण्या