Ticker

6/recent/ticker-posts

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उद्या धाराशिव जिल्ह्याच्या अतिवृष्टी झालेल्या भागाची करणार पाहणी

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार हे उद्या बुधवार, दि. 24 सप्टेंबर 2025 रोजी धाराशिव जिल्ह्याच्या अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. भूम, परंडा व पारगाव तालुका वाशी या तालुक्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर दादा पवार स्वतः प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन नुकसानग्रस्तांची विचारपूस करणार आहेत.


जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात दादा पवार प्रथम दुपारी 12 वाजता वालवड (तालुका भूम) येथे भेट देतील. त्यानंतर दुपारी 2 वाजता परंडा येथे आणि अखेरीस सायंकाळी 5 वाजता पारगाव तालुका वाशी येथे ते पीडित शेतकरी व नागरिकांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.


धुरगुडे यांनी आवाहन केले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी तसेच शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पाहणी दौऱ्यात सहभागी व्हावे.


या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या