Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धाराशिवकडे पाठ,शिंदेंचा अर्धवट दौरा – शेतकऱ्यांचा संताप उसळला,मदतीवरून प्रचारबाजीचे आरोप

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव : धाराशिव जिल्हा अतिवृष्टीने उध्वस्त झाला, हजारो एकर पिके पाण्याखाली गेली, शेतकरी हवालदिल झाले – पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याने संतप्त शेतकरी सरकारवर तुटून पडले आहेत. सोलापूर-लातूरच्या पाहणीनंतर थेट धाराशिवकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याच्या भूमिकेमुळे "मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या वेदना ऐकायलाही तयार नाहीत" असा घणाघाती आरोप शेतकरी व विरोधकांनी केला आहे.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरी भूम-परंडा येथे येऊन पाहणी केली तरी त्यांनी मध्येमध्येच दौरा रद्द करून मुंबईकडे धाव घेतली. शेतकऱ्यांचे दुःख पाहता पाहता सोडून दिल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विरोधकांनी थेट हल्लाबोल करत "शेतकऱ्यांना फक्त आश्वासनं, कृतीत शून्य" अशी बोचरी टीका केली आहे.


याशिवाय मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री शिंदे व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो छापल्यामुळे संताप आणखी भडकला. मदत की प्रचार? असा सवाल उपस्थित झाला असून अनेक गावांमध्ये ग्रामस्थांनी थेट मदत घेण्यास नकार देत गाड्या परत पाठवल्या.


दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. त्यांनी उशिरापर्यंत शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या व पुढील नियोजित दौऱ्यासाठी ते उशीरा बीड कडे रवाना झाले.


धाराशिवच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, त्याकडे मुख्यमंत्री यांचे दुर्लक्ष आणि मदतीतील प्रचारबाजी – या सर्वामुळे संतापाचा ज्वालामुखी भडकण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या