Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेनेच्या तुळजापूर तालुका आढावा बैठकीत उत्साहजनक प्रतिसाद; आगामी निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : शिवसेना तुळजापूर तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आढावा बैठक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस शिवसेना पक्षाचे समन्वयक आणि ज्येष्ठ नेते राजन साळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.


या बैठकीस शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज चौगुले, जिल्हा सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते, जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, युवा सेना जिल्हाध्यक्ष गणेश जगताप तसेच तालुक्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बैठकीदरम्यान तुळजापूर तालुक्यातील संघटनात्मक कामकाज, पक्षवाढ, नवीन कार्यकर्त्यांचा सहभाग, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

शिवसेना तालुका पातळीवर आगामी निवडणुकांसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


या बैठकीत समन्वयक राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. नव्याने पक्षात दाखल झालेल्या युवकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.


यातून शिवसेनेची ताकद ग्रामीण भागात अधिक बळकट होत असल्याचे स्पष्ट झाले.

विशेष म्हणजे, आगामी निवडणुकीत महायुतीसोबत युती न झाल्यास, शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल असा स्पष्ट आणि ठाम संदेश यावेळी देण्यात आला.

"स्वयं स्वबळाचा नारा" देत शिवसैनिकांनी स्वबळावर निवडणुकीच्या तयारीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले.


शिवसेनेच्या या आढावा बैठकीने तालुक्यात नवचैतन्य निर्माण केले असून, आगामी काळात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर ठोस पावले उचलली जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


या बैठकीत प्रामुख्याने तालुका प्रमुख अमोल जाधव, शहर प्रमुख बापू भोसले, उपशहर प्रमुख रमेश चिवचिवे,शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख गणेश नेपते, मीनाताई सोमाजी,राधा घोगरे,रेणुका शिंदे,लता हरवळे, सौरभ भोसले,नितीन मस्के,संजय लोंढे,भुजंग मुकेरकर,संभाजी नेपते,गौरव साळुंखे,बाळासाहेब मस्के,बाळासाहेब पुजारी,मोहन भोसले,मयूर कदम,रितेश जवळेकर,शहाजी हाके,स्वप्निल सुरवसे,विपिन मगर,आबा गुरव,राहुल शिंदे,गणेश व्यवहारे तसेच असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या