Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे व नवनिर्वाचित नगरसेवकांचा भोसले परिवाराकडून भव्य सत्कार

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : तुळजापूर नगरीचे लोकप्रिय नगराध्यक्ष विनोद पिटु भैय्या गंगणे तसेच शहरातील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा समस्त भोसले परिवाराच्या वतीने भव्य सत्कार समारंभ उत्साहात व गौरवपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


या सत्कार समारंभात नगराध्यक्ष व नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तुळजापूर शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी कटिबद्ध राहतील,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


या कार्यक्रमाचे आयोजन भोसले परिवाराच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी भोसले परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक तानाजी भाऊ भोसले व संभाजी बप्पा भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्कार समारंभ अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.


सत्कार समारंभात मान्यवरांनी नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत तुळजापूर शहरात विकासाभिमुख,लोकाभिमुख व पारदर्शक प्रशासनाची अपेक्षा व्यक्त केली. तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांनीही शहराच्या प्रश्नांसाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.


या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचे पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन केले.कार्यक्रमाला शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर व भोसले परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हा सत्कार समारंभ म्हणजे लोकप्रतिनिधींप्रती व्यक्त केलेला विश्वास व सहकार्याचा निर्धार असल्याची भावना यावेळी सर्वत्र व्यक्त होत होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या