Ticker

6/recent/ticker-posts

“सावंत विरुद्ध सावंत?” – तानाजी सावंत यांना डावलण्याचा ठरवून आखलेला डाव उघड!

 


धाराशिवशिवसेनेच्या धाराशिव जिल्ह्यात सध्या एका विचित्र आणि धक्कादायक राजकीय खेळीची चर्चा रंगली आहे. एकाच आडनावाच्या तीन नेत्यांची सावली पक्षात असूनही, एकमेकांना डावलण्याची, दुर्लक्षित करण्याची सुरू असलेली रणनीती आता लपून राहिलेली नाही. विशेषतः राज्याचे मंत्री डॉ. तानाजी सावंत यांना पक्षांतर्गतच जाणीवपूर्वक वगळण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं चित्र स्पष्ट दिसू लागलं आहे.


मागील काही घटनांवर नजर टाकली तर हा संपूर्ण डाव उघड होतो. माढा मतदारसंघात तानाजी सावंत यांचे सख्खे भाऊ शिवाजीराव सावंत यांनी शिवसेनेचा मेळावा आयोजित केला, पण बॅनरवर आणि स्टेजवर तानाजी सावंत यांचा पत्ता नव्हता! हे केवळ विसरून गेले, असं म्हणणं अशक्य – हा एक जाणीवपूर्वक घेतलेला राजकीय निर्णय होता, हे स्पष्ट आहे.


धनंजय सावंताचे कार्यकर्ते यांचेकडी वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर देखील तानाजी सावंत यांचा फोटो दिसलाच नाही. विशेष म्हणजे हा भाग तानाजी सावंत यांचा मतदारसंघ असूनही, त्या ठिकाणी बॅनरवर फोटो झळकतो माजी जि.प. उपाध्यक्ष धनंजय सावंत यांचा!

ज्यांनी पूर्वी बॅनरवर फोटो नसेल तर तो "अपमान" आहे असं शासकीय विश्रामगृहात आवाज उठवला होता – तेच आज गप्प का आहेत?


या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक मोठा आणि धक्कादायक प्रश्न उभा राहतो –


> तानाजी सावंत यांना घरच्याच मंडळींकडून डावलले जात आहे का?

हा ‘भाऊ-बंधू’ नसून ‘सत्तेचा संघर्ष’ आहे का?


या दरम्यान एक वेगळीच चर्चा जिल्ह्यात झपाट्याने पसरतेय – जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या लोकप्रियतेचा आणि वाढत्या संघटनशक्तीचा धसका काही मंडळींनी घेतलाय का? कारण एकीकडे तानाजी सावंत यांना बॅनरवरून गायब केलं जातंय, आणि दुसरीकडे साळुंके यांच्या नेतृत्वाचं बळ लक्षपूर्वक दुर्लक्षित केलं जातंय.


ही केवळ विस्मरण नाही, हा एक ठरवून आखलेला आणि आंतरिक पातळीवरच खेळला जाणारा डाव वाटतोय.

राजकीय गोंधळ उडवणाऱ्यांनी आता गोंधळ न घालणं, फोटोच्या "अपमानावर गप्प राहणं – हे सगळं "संकल्पपूर्वक शांत" असल्याचं लक्षण नाही का?


 एक बॅनर, एक गप्पी गट, आणि एक कट – ही फक्त सुरुवात आहे!


डॉ. तानाजी सावंत यांचं गेल्या अनेक वर्षांचं योगदान, कार्यक्षमता, आणि पक्षावरील निष्ठा सगळं बाजूला सारून जेव्हा त्यांना घरच्याच मंडळींकडून डावललं जातं, तेव्हा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात उभा राहतो –

ही निष्ठा आता ‘भिती’ बनली आहे का?

की नेतृत्वाला रोखण्याचा ही सुपारी घेऊन उभा केलेला अंतर्गत डाव आहे?


 ही बॅनरवरील जागा नाही, ही नेतृत्वावरची छाया आहे!


"तीन सावंतांच्या नावाने सुरू झालेला खेळ, आता एका सावंताला संपवण्याच्या दिशेने झुकतोय" – आणि हीच धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेची खरी बिकट स्थिती आहे.


शेवटी, बॅनर नसला तरी जनतेच्या मनावर ठसा कोरलेली व्यक्ती हीच खरी नेता ठरते... आणि ती जागा कोण भरू शकतो, हे वेळच ठरवेल!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या