Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूरमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी – शिवसेनेच्यावतीने अभिवादन

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर तुळजापूर येथील शिवसेना पक्ष कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना तुळजापूर तालुक्याच्यावतीने करण्यात आले होते.


महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात महापुरुषांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांची प्रेरणा घेण्याचे महत्व अधोरेखित करण्यात आले.


या वेळी प्रमुख उपस्थितीत शिवसेना तालुकाध्यक्ष अमोल जाधव,शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश नेपते,शहर उपाध्यक्ष रमेश चिवचवे,नितीन मस्के, संजय लोंढे, सौरभ भोसले, रितेश जावळेकर,गोटन बिडकर,सिंदफळ शाखाप्रमुख राहुल शिंदे,ग्रामपंचायत सदस्य आबा गुरव,मानेवाडीचे माजी उपसरपंच व शिवसेना नेते शहाजी हाके,वानेगावचे सरपंच अप्पासाहेब पाटील,लक्ष्मण पाटील,गोंधळवाडीचे माजी सरपंच संदिपान मोटे असे शिवसेना नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन्ही थोर महापुरुषांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी समाजातल्या वंचित, शोषित घटकांना आवाज दिला, तर लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा नारा देत भारतीय स्वातंत्र्यलढ्याला दिशा दिली, असे वक्तव्य उपस्थितांनी यावेळी केले.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील नागरिकांनीही कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या