Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूरमध्ये शिवसेनेची उद्या होणार आढावा बैठक – शिवसेना समन्वयक राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकटीसाठी महत्त्वपूर्ण दिशा

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पक्ष बळकटीकरणाचा निर्धार केला असून, त्याअंतर्गत उद्या तुळजापूर येथे एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे नेतृत्व शिवसेना समन्वयक तथा माजी आमदार राजन साळवी करणार आहेत.


या बैठकीस शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज चौगुले,जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, तालुकाध्यक्ष अमोल जाधव तसेच तालुक्यातील व शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता हा आढावा मेळावा पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहे.


बैठकीदरम्यान आगामी निवडणुकांचे नियोजन, संघटनात्मक बळकटीकरण, कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणे, आणि स्थानिक समस्या व विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. राजन साळवी हे या बैठकीत विविध विषयांवर मार्गदर्शन करणार असून, त्यांच्या अनुभवाचा लाभ कार्यकर्त्यांना होणार आहे.


तुळजापूर तालुका व शहरात शिवसेनेचा झेंडा अधिक भक्कमपणे फडफडावा यासाठी ही बैठक मैलाचा दगड ठरणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि पक्ष संघटना नव्याने सजग करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची संधी मानली जात आहे.


शिवसेनेच्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे ही बैठक भविष्यातील राजकीय दिशा ठरवणारी ठरणार असून, कार्यकर्त्यांमध्ये नवउमंग आणि जिद्द निर्माण करण्याचा निर्धार यातून स्पष्ट होतो.


सर्व पदाधिकारी,संपूर्ण सेलचे पदाधिकारी व शिवसैनिक या आढावा बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तुळजापूर तालुका अध्यक्ष अमोल जाधव यांनी केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या