प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : "अनाथांचा नाथ एकनाथ" या भावस्पर्शी संकल्पनेवर आधारित शिवसेना तालुका व शहर शाखेच्या वतीने तुळजापूर शहरात एक स्तुत्य व सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. जय तुळजाभवानी माता शाळेतील अनाथ आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप करून त्यांच्या शिक्षणप्रवासातील अडचणी दूर करण्याचा आणि समाजाशी नाळ घट्ट करण्याचा हेतू या उपक्रमामागे होता.
या उपक्रमाअंतर्गत पावसाळ्यात शाळेत येताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना छत्र्या वाटण्यात आल्या. यानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रेमळ अल्पोपहाराचे आयोजनही करण्यात आले. उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग यांच्याकडून शिवसेनेच्या या प्रयत्नाचे भरभरून स्वागत झाले.
कार्यक्रमाचे नेतृत्व तुळजापूर तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांनी केले. त्यांच्या सोबत शहराध्यक्ष बापूसाहेब भोसले, शहर उपाध्यक्ष काकासाहेब चिवचवे, महिला जिल्हा आघाडीच्या मीनाताई सोमांजी, युवा सेना अध्यक्ष सौरभ भोसले, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष गणेश नेपते, महिला शहराध्यक्ष राधा घोगरे, शहाजी हाके, स्वप्निल सुरवसे, नितीन मस्के, संजय लोंढे, संभाजी नेपते, मोहन भोसले, आफताब तांबोळी, गितेश जवळेकर आदी मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.
शाळेच्या वतीने उमाकांत तपसाळे, मुख्याध्यापक गरडसर सर, सोमवारे सर, पवार सर, श्रीमती जाधव मॅडम, श्रीमती लोखंडे मॅडम, कुमारी शीलवंत मॅडम, कुमारी डोलारे मॅडम व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत विद्यार्थ्यांना प्रेमाने अल्पोपहार वाटप करत त्यांच्याशी संवाद साधला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान पाहून उपस्थित सगळ्यांच्याच डोळ्यांत आनंदाश्रू आले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शिवसेनेच्या लोकाभिमुख कार्यशैलीची पुनःप्रतीती तुळजापूरवासीयांना आली आहे.
‘अनाथांचा नाथ एकनाथ’ हा उपक्रम केवळ मदतीपुरता मर्यादित न राहता, समाजाच्या प्रत्येक घटकाशी आपुलकीची नाळ जोडणारा एक प्रेरणादायी साखळीदर बनत आहे.
शिवसेना तुळजापूर तालुका व शहर शाखेचा हा स्तुत्य उपक्रम निश्चितच इतर राजकीय-सामाजिक संस्थांसाठी आदर्श ठरेल.
0 टिप्पण्या