Ticker

6/recent/ticker-posts

दिग्गज नेत्याचे टेन्शन वाढले; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी तुळजापूर विधानसभेच्या उमेदवारीसाठी पक्षाकडे केली रीतसर मागणी


प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर:राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालय मुंबई येथे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांच्याकडे तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी तुळजापूर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवारीची रीतसर फॉर्म भरून उमेदवारीची मागणी केली आहे.

आज मुंबई येथील कार्यालय येथे जाऊन धैर्यशील पाटील यांनी आपला उमेदवारी मागणीचा उमेदवारी अर्ज पक्ष कार्यालय येथे जमा केला आहे.त्यामुळे संपूर्ण तुळजापूर तालुक्यात राजकीय वातावरण तापण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

तुळजापूर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मोठ्या मोठ्या दिग्गजानी उमेदवारीसाठी मागणी केली असतानाच त्यातच तुळजापूर तालुका अध्यक्ष यांनी उमेदवारी साठी मागणी केल्यामुळे मोठ मोठ्या दिग्गजाचे भुवया उंचावलेले पाहायला मिळत आहेत. 

काही दिग्गजांनी तुळजापूर विधानसभेसाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून अचानकपणे तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी उमेदवारीची मागणी केल्यानंतर आता पक्षामध्ये बंडखोरी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

तुळजापूर तालुक्यामध्ये धैर्यशील पाटील यांचा मोठा धबधबा असल्यामुळे सर्वच दिग्गज त्यांचा हात धरून तुळजापूर तालुक्यामध्ये प्रचार करण्यास सुरुवात केली होती पण अचानक पणे स्वतः धैर्यशील पाटील यांनीच उमेदवारी मागितल्यामुळे राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. 

तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळे जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटल्यास धैर्यशील पाटील हेच उमेदवार असतील असे मत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे. आगामी होणाऱ्या विधानसभेसाठी तुळजापूर विधानसभा ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार व महाविकास आघाडीमध्ये तुळजापूर विधानसभेसाठी कोणत्या उमेदवाराचे नाव घोषित होणार याकडे संपूर्ण नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या