Ticker

6/recent/ticker-posts

सिंदफळ जिल्हा परिषद गटात यशवंत सेनेचा रणसंग्राम;प्रचाराने ढवळून निघाले राजकीय समीकरणे!

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

सिंदफळ : सिंदफळ जिल्हा परिषद गटामध्ये नव्या राजकीय शक्तीच्या रूपाने उदयास आलेल्या यशवंत सेनेने प्रचाराच्या मैदानात धुमाकूळ घातला असून संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.यशवंत सेनेच्या आक्रमक एन्ट्रीमुळे पारंपरिक राजकीय पक्षांमध्ये स्पष्टपणे अस्वस्थता आणि धास्तीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.


संपूर्ण सिंदफळ जिल्हा परिषद गटासह पंचायत समिती गटामध्येही यशवंत सेनेने दमदार उमेदवार मैदानात उतरवत थेट आव्हान उभे केले आहे.सिंदफळ जिल्हापरिषद साठी सौ.पुजा अजित क्षिरसागर,सिंदफळ पंचायत समिती गणासाठी सौ.तनुजा गणेश व्यवहारे तसेच अपसिंगा पंचायत समिती गणामध्ये सौ.आनंदाबाई गोरख सोनवणे यांनी निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.त्यामुळे ही निवडणूक केवळ लढत न राहता सत्तेच्या समीकरणांना हादरा देणारी ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.


यशवंत सेनेच्या प्रचारात दिसणारी ऊर्जा, कार्यकर्त्यांची ताकद आणि जनतेचा वाढता प्रतिसाद पाहता प्रचारात घेतलेली आक्रमक उडी निर्णायक ठरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गावोगावी होणाऱ्या बैठका, पदयात्रा आणि जनसंवादातून यशवंत सेनेची लोकप्रियता झपाट्याने वाढताना दिसत असून ‘विजयाचा गुलाल याच गटातून लागणार’ अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.


येत्या 7 फेब्रुवारी रोजी मतदार कोणाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतात, याचे उत्तर 9 फेब्रुवारी रोजी निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार असले तरी, सध्या मात्र सिंदफळ जिल्हा परिषद गटामध्ये यशवंत सेनेचा बोलबाला आणि विजयाचे सूर जोरात उमटत आहेत.


सिंदफळचा रणसंग्राम आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, यशवंत सेनेची घोडदौड कुणाला थांबवता येणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या