Ticker

6/recent/ticker-posts

विधी सेवाचिकित्सालयाचे उद्घाटन दाबका ग्रामपंचायत कार्यालय येथे संपन्न


प्रतिनिधी : फिरोज पटेल 

उमरगा: तालुका विधी सेवा समिती उमरगा व विधीज्ञ मंडळ उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विधी सेवाचिकित्सालयाचे उद्घाटन ग्रामपंचायत कार्यालय दाबका येथे करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.बी.रेमणे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर उमरगा प्रमूख पाहूणे केतनकुमार तेलगांवकर सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर उमरगा अध्यक्ष विधीज्ञ मंडळ उमरगा ॲड.एम.पी.कोथिंबीरे,ॲड.एस.एम‌.देशपांडे सहाय्यक सरकारी वकील उमरगा तसेच उपस्थित विधिज्ञ मंडळ उपाध्यक्ष ॲड.एम.एन.बनसोडे,सचिव ॲड.एस.एस‌.बिराजदार,सहसचिव ॲड.भाग्यश्री गुंड पवार कोषाध्यक्ष ॲड.कृष्णा पाटील उमरगा विधीज्ञ मंडळ माजी अध्यक्ष ॲड.जी.के.गायकवाड,ॲड.एस. एस.पवार,ॲड.काशिनाथ राठोड,ॲड.हिराजी गायकवाड,ॲड.विवेक गायकवाड,ॲड.शुभम सुर्यवंशी,ॲड.सुशील शिंदे,ॲड.एन.एस.शिंदे,ॲड.एन.बी.शिंदे,ॲड.एस.के बिराजदार,ॲड.एस.पी.ईनामदार हजर होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.व्ही. एस.आळंगे विधीज्ञ मंडळ उमरगा यानी केले.तर विशेष मार्गदर्शन ॲड.एस.एम.देशपांडे सहाय्यक सरकारी वकील उमरगा यांनी केले.

पी.बी.रेमणे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर उमरगा यांनी विधी सेवा चिकित्सालयाचे उद्घाटन केले.व विधी विषयक सल्लागार म्हणून ॲड.एफ.के.खान यांची नियुक्ती करण्यात आली तसेच नंदकिशोर शिंदे यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सर्व उपस्थित ग्रामस्थांना केतनकुमार तेलगांवकर सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर उमरगा यांनी विधी सेवा चिकित्सालय म्हणजे काय याबद्दल माहिती दिली तसेच पी. बी रेमने दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर उमरगा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विधी सेवा चिकित्सालय कक्षात मोफत सल्ला देण्यात येणार असे सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.ॲड.बी.बी.गुंड पवार व आभार प्रदर्शन प्रा.डॉ.शौकत पटेल यांनी मानले.तालुका विधी सेवा समिती उमरगा येथील वरिष्ठ लिपिक डी. सी. कांबळे व शिपाई कुलदीप चिकले यांनी काम पाहिले.

ग्रामपंचायत कार्यालय दाबका सरपंच तथा सदस्य व गावातील ग्रामस्थ मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते.तसेच सर्व मान्यवरांचा सत्कार ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या