Ticker

6/recent/ticker-posts

कमलाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत घेण्यात आला वृक्षारोपण कार्यक्रम


प्रतिनिधी : अशोक गरड 

औसा: कमलाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही विविध क्षेत्रात विविध उपक्रम राबवण्यासाठी अग्रेसर असून सतत सामाजिक उपक्रम राबवित आहे.तसेच (दि.३ ) रोजी चलबुर्गा वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती शाळा येथे कमलाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.संस्थेच्या माध्यमातून एक मूल एक झाड अशी संकल्पना घेऊन विद्यार्थी संख्यानुसार झाड वितरण व लागवड करण्यात आले आहे. तसेच झाडे लावून निसर्गाचे संवर्धन कसे राखता येईल यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री.प्रमोद सुरवसे,श्री. सतीश गायकवाड,श्रीमती अंजली ताई कांबळे,श्री मिलिंद कांबळे श्री.अनिल शिंदे श्रीमती वनिता शिंदे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.होळकर सर,श्रीमती साधना सुरवसे मॅडम,कोसल्याताई जाधव आणि शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या