प्रतिनिधी : मिलिंद भांगरे
मंचर: रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर या ठिकाणी (दि.०६) रोजी राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर उद्घाटन व वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान कॉलेजचे सन्माननीय प्राचार्य डॉ. गायकवाड एन. एस. यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस.कार्यक्रमाधिकारी श्री. गव्हाणे ए.एन.यांनी केले.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री.मडके शशिकांत वनपरिमंडळ अधिकारी,मंचर हे उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा.डॉ.सदाफळ व्हि.डी.सर यांनी विद्यार्थ्यांना एन.एस.एस.मधील संधी याबाबत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास जूनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री.कणसे पी.एस. उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी केले तर श्री.ढगे बी.डी. यांनी उपस्थितांचे आभार मानून सदर कार्यक्रम संपन्न झाला.यानंतर सर्व प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे हस्ते कॉलेजच्या परिसरामध्ये १० आवळा रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
0 टिप्पण्या