Ticker

6/recent/ticker-posts

अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान धाराशिव जिल्हात पोलिसांच्या वतीने तब्बल ३५ ठिकाणी करण्यात आली छापेमारी


 प्रतिनिधी : जुबेर शेख

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात विविध गावांमध्ये अवैद्य दारू विक्रीवर छापेमारी करण्यात आली.यामध्ये एकाच दिवशी तब्बल ३५ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. 

मिळालेल्या माहितीनुसार मा.पोलीस अधीक्षक श्री.संजय जाधव व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.गौहर हसन यांच्या आदेशावरुन काल रविवारी (दि.०८) रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान ३५ कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे २,९१० लि. द्रवपदार्थ नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर सुमारे १,०७६ लि. गावठी दारु, सुमारे २,१४५ लि. सिंधी ताडी अम्ली द्रव व देशी- विदेशी दारुच्या एकुण १६९ बाटल्या असे मद्य जप्त केले. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थ व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे ४,४०,३९० ₹ आहे. यावरुन ३५ व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात ३५ गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.

१) धाराशिव ग्रामीण पो ठाणेच्या पथकाने ६ ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-रमेश दादाराव गाढवे, वय ४२ वर्षे, रा.वरुडा ता. जि. धाराशिव हे १३:०५ वा. सु. मारुती गाडवे यांचे शेडसमोर अंदाजे १,६२० ₹ किंमतीची १८ लिल. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-यादव शेकबा खंडागळे, वय ६५ वर्षे, रा.जुनोनी ता. भुम जि. धाराशिव हे १४:०० वा. सु.गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे १,१९० ₹ किंमतीची १३ लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-भारत राम काळे, रा. शिंदेवाडी ता. जि. धाराशिव हे १६:१० वा. सु.गावातील आपल्या राहत्या घरासमोरील अंगणात अंदाजे १,४६० ₹ किंमतीची १६ लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.आरोपी नामे-महेश उर्फ बिंड्या दिलीप हाके, वय २७ वर्षे, रा.येडशी ता. जि. धाराशिव हे १६.५५ वा. सु.जनता विद्यालयासमोर पत्र्याचे शेडसमोर मोकळ्या जागेत अंदाजे १,३०० ₹ किंमतीची २० लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-संगीता नामदेव काळे, वय ५८ वर्षे, रा. गावसुद ता.जि. धाराशिव या १६.०० वा. सु.गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे १८,००० ₹ किंमतीची ३०० लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-बंडु दत्तु जाधव, रा. गंजेवाडी ता. जि. धाराशिव हे १६:३० वा. सु.कृष्णापान सेंटरच्या मोकळ्या जागेत अंदाजे ८७५ ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या २५ सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.

२) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३ ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-आकाश तात्याराम डोंगरे, वय २४ वर्षे, रा.वैरागनाका फकिरानगर धाराशिव ह.मु. इंदीरारनगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे १८:३० वा. सु इंदीरापगर धाराशिव येथे अंदाजे १९,००० ₹ किंमतीचे १९० लि. सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.

आरोपी नामे-काजल अंकुश काळे, वय २५ वर्षे, रा. झोपडपट्टी गावसुद ता. जि. धाराशिव या १६:०० वा. सु गावसुद झोपडपट्टी येथे अंदाजे २७,८०० ₹ किंमतीचे ४०० लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व ७० लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-राजेंद्र रघु पवार, वय ४० वर्षे,रा. झोपडपट्टी गावसुद ता. जि. धाराशिव हे १७:३० वा. सु झोपडपट्टी गावसुद येथे अंदाजे १३,४०० ₹ किंमतीचे २०० लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व ३० लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.

३) भुम पो ठाणेच्या पथकाने २ ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-कृष्णा नारायण सांगळे, वय ४३ वर्षे, रा. चिंचपुर ढगे ता. भुम जि. धाराशिव हे १७:३० वा. सु. बसस्थानकचे शेजारी शेडचे पाठीमागे अंदाजे ८४० ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या १२ सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-तानाजी शिवाजी सावंत, वय ४४ वर्षे, रा.वालवड, ता. भुम जि. धाराशिव हे १८:१५ वा. सु. गारवारा हॉटेलच्या पाठीमागे अंदाजे १,०५० ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या १५ सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.


४) येरमाळा पो. ठाणाच्या पथकाने २ ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-राणीबाई महादेव शिंदे, वय ३० वर्षे, रा. चिमणमाळ पारधीपीडी तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव या ०८:५० वा. सु गावातील आपल्या राहत्या घराचे पाठीमागे अंदाजे ३६,९७० ₹ किंमतीची ६०० लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व ४ लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-सिताराम पाराजी शिंपले, वय ४९ वर्षे, रा. बावी ता. वाशी जि. धाराशिव हे १९:५० वा. सु गावातील आपल्या राहत्या घराचे पाठीमागे अंदाजे २,५८० ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या ७ बाटल्या व १५ लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.


५) धाराशिव शहर पो. ठाणाच्या पथकाने ३ ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-सिराज नजीर कुरेशी, वय ५२ वर्षे, रा. खिरणीमळा धाराशिव ता. जि. धाराशिव हे १२:०० वा. सु बौध्दनगर धाराशिव येथे अंदाजे ६,४०० ₹ किंमतीची ८० लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-निलावती सुरेश काळे, वय ४२ वर्षे, रा. पळसप ता. जि. धाराशिव ह.मु. बोंबले हनुमान मंदीर परिसर ता. जि. धाराशिव या १८:२५ वा. सु हनुमान मंदीर परिसरात धाराशिव येथे अंदाजे २,१६० ₹ किंमतीची २७ लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-लक्ष्मण उत्तम पेटे, वय ६६ वर्षे, रा. बौध्दनगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे १६:३० वा. सु वडगाव शिवारात अंदाजे ५२५ ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या २० सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.


६) तामलवाडी पो. ठाणाच्या पथकाने ३ ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-लक्ष्मी राजेंद्र भडांरी रा. काटी ता. तुळजापूर जि. धाराशिव या १८:०० वा. सु गावातील आपल्या रहात्या घरासमोर अंदाजे ३,५०० ₹ किंमतीची ५५ लि. सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-लिंबाजी थावरु राठोड, वय ६५ वर्षे, रा.वडजी तांडा ता. दक्षिण सोलापूर जि.सोलापूर हे १८:०२ वा. सु खडकी शिवारात अंदाजे ५०,००० ₹ किंमतीचे १,२०० लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-कालीदास चांगदेव काळे, वय ४५ वर्षे, रा.वडगावकाटी पारधीपीडी ता. तुळजापूर हे १८:४५ वा. सु गावातील आपल्या रहात्या घराचे समोर अंदाजे ५,४०० ₹ किंमतीची ६० लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.

७) कळंब पो. ठाणाच्या पथकाने ३ ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-अश्विनी बालाजी काळे, वय ३० वर्षे, रा.खडकी रोड डिकसळ पारधीपीडी कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे १२:४० वा. सु आपल्या शेडसमोर अंदाजे ५,२०० ₹ किंमतीची ४० लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व ३० लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-बालाजी बन्सी बावळे, वय ५८ वर्षे, रा. ईटकुर ता. कळंब जि. धाराशिव हे १३:४० वा. सु राज बीयरबार समोर रोडवर पानटपरीचे बाजूला अंदाजे १,२६० ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या १८ सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-रामेश्वर एकनाथ आडसुळ, वय ६० वर्षे, रा.ईटकुर ता. कळंब जि. धाराशिव हे १४:५० वा. सु. इटकुर शिवार येथे अंदाजे २,८०० ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या ४० सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.


८) परंडा पो.ठाणाच्या पथकाने २ ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-सुरेश सरदार काळे, वय ४९ वर्षे, रा.जवळा नि. ता. परंडा जि. धाराशिव हे १६:३० वा. सु गावातील आपल्या रहात्या घराचे बाजूला अंदाजे ४,१७० ₹ किंमतीची २९ गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-विष्णु बापु काळे, वय ३५ वर्षे, रा. दुधी ता. परंडा जि. धाराशिव हे १८:३० वा. सु संतोष कदम यांचे शेताजवळील ओढ्यात अंदाजे २,००० ₹ किंमतीची २० ‍लि. गावठी दारुअवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.


९) तुळजापूर पो.ठाणाच्या पथकाने २ ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-दत्ता राम कांबळे, वय ३८ वर्षे, रा.सिंदफळ ता. तुळजापूर जि. धाराशिव हे १९:३० वा. सु सिंदफळ गावात भिमनगर जाणारे रोडचे बाजूस अंदाजे ५,२०० ₹ किंमतीची ६५ गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-रवि भगवान क्षीरसागर, वय ३५ वर्षे, रा. अण्णाभाउ साठे नगर अपसिंगा ता. तुळजापूर जि. धाराशिव हे १९:३५ वा. सु गावातील आपल्या रहाते घरासमोर अंदाजे ५,५०० ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या ५ सिलबंद बाटल्या व ७५ ‍लि. गावठी दारुअवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.


१०) वाशी पो. ठाणाच्या पथकाने १ ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-शालनबाई रामा शिंदे, वय ४२ वर्षे, रा. भैरवनाथ शुगर कारखान्याचे समोर तांदळवाडी शिवार ता. वाशी जि. धाराशिव या १४:४० वा. सु गावातील आपल्या रहाते घराचे पाठीमागे अंदाजे १०,४०० ₹ किंमतीची ३० लि. गावठी दारु व १५० लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.


११) शिराढोण पो.ठाणाच्या पथकाने १ ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-संतोष भिमराव राठोड, वय ३० वर्षे, रा. घारगाव तांडा ता. कळंब जि. धाराशिव हे १५:४० वा. सु.गावातील आपल्या रहात्या घरासमोर अंदाजे २१,००० ₹ किंमतीचे २०० लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व ५० लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली


१२) ढोकी पो. ठाणाच्या पथकाने १ ठिाकणी छापा टाकला. आरोपी नामे-विश्वंभर भिमा काळे, वय ४६ वर्षे, रा. पारधी पीडी तेर ता. जि. धाराशिव हे १३:०० वा. सु तेर येथे अंदाजे ३३,६०० ₹ किंमतीचे ३०० लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व ६० लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.


१३) लोहारा पो.ठाणाच्या पथकाने १ ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-बालाजी कुंडलीक कांबळे, वय ५३ वर्षे, रा. भिमनगर कानेगाव ता. लोहारा जि. धाराशिव हे ११:४० वा. सु आपल्या रहात्या घरासमोर अंदाजे ९६० ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.


१४) बेंबळी पो. ठाणाच्या पथकाने १ ठिाकणी छापा टाकला. आरोपी नामे- सिकंदर बाबु काळे, वय ६० वर्षे, रा.खंडोबानगर झेपडपट्टी बेंबळी ता. जि. धाराशिव हे १७:४५ वा. सु खंडोबानगर झोपडपट्टी बेंबळी येथे अंदाजे २,८०० ₹ किंमतीची २८ लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.


१५ ) उमरगा पो. ठाणाच्या पथकाने १ ठिाकणी छापा टाकला. आरोपी नामे- उसनय्या मारुती तेलंग, वय २५ वर्षे, रा.मारुती पापरी ता. मोहळ ह.मु. डिग्गी रोड ता. उमरगा जि. धाराशिव, विठ्ठल संगमेश्वर वाघमारे, वय २२ वर्ष, रा. डिग्गी ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे १४:३० वा. सु मल्लीनाथ महाराज मठाजवळ पत्र्याचे शेडसमोर डिग्गी येथे अंदाजे १,५२,००० ₹ किंमतीची १,९००/- लि. सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.


१६) आनंदनगर पो. ठाणाच्या पथकाने १ ठिाकणी छापा टाकला. आरोपी नामे- शिवाजी शंकर पवार, वय ३७ वर्षे, रा.रामरहिमनगर सांजा ता. जि. धाराशिव, हे १८:३५ वा. सु सांजागाव पारधी पीडी येथे रोडलगत अंदाजे ९६० ₹ किंमतीची १२ लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.


१७ ) नळदुर्ग पो. ठाणाच्या पथकाने १ ठिाकणी छापा टाकला. आरोपी नामे- धीरज भिक्कमसिंह परदेशी रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव हे २०:०० वा. सु निसर्ग हॉटेलच्या बाजूला मोकळ्या जागेत नळदुर्ग शिवार येथे अंदाजे १,०५०/- किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या १५ सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.


१८) मुरुम पो. ठाणाच्या पथकाने १ ठिाकणी छापा टाकला. आरोपी नामे- गुंडू उमाजी चव्हाण, वय ४९ वर्षे, रा. नाईकनगर सु. ता. उमरगा जि. धाराशिव हे १९:३० वा. सु देवा पवार यांचे घरासमोर रोडलगत अंदाजे २,४००/- किंमतीची २४ लि. गावठी दारुअवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या