प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर: तुळजापूर शहरांमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.शहरातील १७ वर्षे मुलीवर चुलत्याने व त्याच्या मित्राने मिळून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.सदरील प्रकरणाचा तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला असून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,तुळजापूर शहरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर (दि.७) रोजी रात्रीच्या १ वाजेच्या सुमारास ती मुलगी बाथरूमसाठी उठली असता पीडित मुलीचा चुलता पाठीमागून येऊन हात धरून " तू मला खूप आवडतेस तू खूप सुंदर आहे." असे म्हणले व ही सदरील प्रकार आई-वडिलांना सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली.
व माझे चुलते मागील १ वर्षापासून घरी कोण नसल्यास माझे हात धरून माझ्यासोबत मला लाजवेल अशा प्रकारचे कृत्य सुद्धा करतात. व मला मागील २ वर्षापासून त्रास देत आहेत.तसेच माझ्या चुलत्याचे मित्र हे माझ्या चुलत्या सोबत मागील १ वर्षापासून घरी येत आहेत.व मला बघून अश्लील चाळे करतात व मला जातीवाचक बोलून मला ओरडतात." आशा पीडित मुलींने दिलेल्या जबावावरून तुळजापूर पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.आरोपींना कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी दली आहे.तर सदरील प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस यांच्या वतीने करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या