Ticker

6/recent/ticker-posts

एकंबी तांडा येथील मंदिरास दहा लक्ष रुपये निधी दिल्याबद्दल आ.अभिमन्यू पवार यांचे मानले ग्रामस्थांनी आभार


प्रतिनिधी:अशोक गरड

औसा:एकंबी तांडा येथे देवी मंदिरसाठी औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या स्थानिक निधीतून दहा लक्ष रुपये निधी दिल्याबद्दल एकंबी तांडा येथे महेश चव्हाण यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांना याविषयी माहिती देण्यात आली.माहिती देताच तांड्यातील ग्रामस्थांनी आमदार अभिमन्यू पवार की जय अशा जयघोषाने परिसर दणकावून सोडला.

यावेळी वसंतराव नाईक तांडा सुधार वस्तीचे अध्यक्ष श्री सुरेश भाऊ राठोड,भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुधीर भाऊ पोतदार,माजी जिल्हा परिषद सदस्य भारत सिंग राठोड,संत सेवालाल तांडा समृद्धी योजना व वसंतराव नाईक तांडा सुधार वस्ती योजना सदस्य महेश चव्हाण,भाजपा तालुका सचिव संदीप शिवंचारी,श्रावण राठोड व तांड्यातील दत्ता साहेब राठोड,शेषराव जाधव,गोपाळ राठोड,दाजी राठोड,दिलीप चव्हाण,शिवाजी राठोड व सर्व बंजारा बांधव ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या