प्रतिनिधी : अशोक गरड
लातूर:लातूर येथे (दि.१९) रोजी कमलाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.लहान बालक अनाथ बालक आणि विधवा स्त्री,सामान्य नागरिक यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री.प्रमोद सुरवसे,श्रीमती.कमल सुरवसे,श्रीमती. पूनम कांबळे,श्री.अनिल शिंदे,मिलिंद कांबळे तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय डॉ.श्री आनंद बरगाले,डॉ.श्री तुकाराम नरवटे,फार्मसिस्ट श्री.सचिन चाटे नर्स व शिबीर समन्वयक श्री.हेमंत लोहारे आणि चलबुर्गा श्री.काशिराम परिहार उपसरपंच श्री.दगडु मोरे आणि सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.
0 टिप्पण्या