प्रतिनिधी : जुबेर शेख
नळदुर्ग:तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे गैरकायद्याची मंडळी जमवून एकास मारहाण करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,आरोपी नामे- रंगनाथ संदीपान दबडे,विजय राजेंद्र जाधव,कालीदास बलभिम जाधव,अक्षय नेताजी मारेकर,आकाश लक्ष्मण बनसोडे,दिपक प्रकाश बनसोडे,प्रशांत सुधाकर दबडे,राहुल महेश देशमुख,नागनाथ बाबु राघुजी सर्व रा.लोहगाव ता.तुळजापूर जि.धाराशिव यांनी ( दि.१७ ) रोजी १०:३० वाजेच्या सुमारास मारुती मंदीराच्या पाठीमागे मठाच्या मोकळ्या जागेत लोहगाव येथे फिर्यादी नामे-सातलिंग मल्लीनाथ पाटील,वय ४७ वर्षे,रा.लोहगाव ता.तुळजापूर जि.धाराशिव यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून " तु गावचा पुढारी आहे का थांब तुझे पुढारपण काढतो " असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,लोखंडी सळई,लोखंडी दांड्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले.तसेच फिर्यादीचा पुतण्या हा भांडण सोडवण्यास आला आसता नमुद आरोपींनी त्यासही शिवीगाळ करुन मारहाण केली.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सातलिंग पाटील यांनी (दि.२०) रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे भा.न्या.सं. कलम ११८(२),११८(१),११५(२),१८९(२),१९१(२),१९१(३),१९०,३५२,३५१(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
0 टिप्पण्या