Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई येथे केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग यांची २८ सप्टेंबर रोजी संयुक्त पत्रकार परिषद


प्रतिनिधी : जुबेर शेख 

मुंबई:महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी लागणार आसल्याची माहीती मिळत आहे.केंद्रीय निवडणूक आयोग हे २६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये येणार आहे.त्यांचा हा दौरा २ दिवसांचा असणार असुन त्या सर्व परिस्थितीचा व निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे.

२७ सप्टेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्वाची बैठक बोलवण्यात आली.यामध्ये सर्व आढावा घेण्यात येणार आहे.या बैठकीमध्ये सर्वच अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी सकाळी पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांची बैठक होणार यामध्ये आढावा घेऊन त्यांना काही विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.बैठक संपन्न होताच दुपारी ०४:३० वाजता केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.या पत्रकार परिषद मध्ये आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुक संदर्भात कोणती महत्वाची घोषणा होणार का?हे बघावे लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या