Ticker

6/recent/ticker-posts

मिरवणुकीचा अनावशक खर्च टाळून गरजावंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप


प्रतिनिधी:-अहमद अन्सारी

तुळजापूर:-तुळजापूर तालुक्यातील मौजें काक्रबा येथील शिव गणेश मंडळातर्फे आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला आहे. मिरवणुकीचा अनावश्यक खर्च टाळून गरजावंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून तालुक्यामध्ये एक आदर्श गणेश मंडळ म्हणुन नाव लौकिक केले आहे 

तुळजापूरचे माजी नगरसेवक नागनाथ भाऊ भांजी यांच्या हस्ते आई-वडील नसलेल्या काक्रंबा गावातील अठरा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले 

 मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्द शिव गणेश मंडळाचा सर्वत्र कौतुक होत आहे 

 यावेळी तुळजापूरचे माजी नगरसेवक नागनाथ भाऊ भांजी , सुर्वे सर, शिव गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
 
विशेषतः काक्रंबा बिट अंमलदार पोपलाईट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिव गणेश मंडळाने सामाजिक कार्यक्रमचे आयोजन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या