Ticker

6/recent/ticker-posts

कुस्ती स्पर्धेत विजय झालेल्या विद्यार्थ्यांचा शालेय समितीच्या वतीने करण्यात आला सत्कार


प्रतिनिधी : अशोक गरड 

औसा: क्रीडा व युवक कल्याण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा २०२४ - २५ क्रीडा संकुल लातूर येथे ( दि.१४ ) रोजी आयोजित केलेल्या रोमन ग्रीको कुस्ती स्पर्धेत १७ वर्षाखालील वयोगटातील ७१ किलोग्राम वजन गटात आदर्श गजानन तांबोळकर यांचा प्रथम क्रमांक येऊन त्यांची विभाग स्तरावर निवड झाली आहे. 

तसेच अभय राजकुमार कांबळे यांची ५५ किलो ग्राम वजन गटात दुसरा क्रमांक आल्याबद्दल शालेय संस्थेच्या वतीने त्यांचा पुष्पहार घालून त्यांना शुभेच्छा देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या