प्रतिनिधी: जुबेर शेख
तुळजापूर: तुळजापूर विधानसभेचे जसे जसे निवडणुका जवळ येतील तसे तस वातावरण तापत आहे.अनेक इच्छुक उमेदवाराकडून प्रत्येक गाव भेट दौरा चालू झाला आहे.तर अनेक इच्छुक उमेदवार कडून गावातील अनेक गणेश मंडळाला भेटी देऊन त्यातील समस्त नागरिकांना संवाद साधण्यात येत आहे.
त्यातच तुळजापूर विधानसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी व काक्रंबा या गावातील गणेश मंडळांना भेट देऊन त्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली व तेथील समस्त उपस्थित नागरिकांना संवाद साधण्यात आला.यावेळी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने धैर्यशील पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका उपाध्यक्ष रुबाब पठाण,अण्णासाहेब जाधव,माणिक चव्हाण,सोमनाथ गवळी,अनिल शिंदे,रमाकांत नवगिरे,अण्णा धट,बबलू नवगिरे,राम काटे,गणेश नवगिरे,सौदागर जाधव,ज्ञानेश्वर नवगिरे,शहाजी नन्नवरे व गणेश मंडळाचे कार्यकर्ते तसेच गावातील असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या