Ticker

6/recent/ticker-posts

विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत रुद्राक्ष तांबोळकर यांची निवड


प्रतिनिधी: अशोक गरड

औसा:औसा तालुक्यातील शिवणी बु येथील शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थी रुद्राक्ष संतोष तांबोळकर याची 55 किलो ग्राम वजन गटातून क्रीडा संकुल लातूर येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटविला आहे तसेच याची विभाग स्तरावर निवड सुद्धा करण्यात आली आहे. 

विभागस्तरावर निवड झाल्याबद्दल संस्थेचे सचिव बबनराव भोसले व मुख्याध्यापक,शिक्षक,कर्मचारी यांच्या वतीने रुद्राक्ष तांबोळकर यांना निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या