प्रतिनिधी :अशोक गरड
औसा: शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवणी बु येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये पाच खेळाडूंनी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला व जिल्ह्यातील कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. तसेच जिल्हास्तरीय जोदो स्पर्धेमध्ये दोन विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली.या जोदो स्पर्धेत निवड झालेले विद्यार्थ्यांमध्ये
१) दत्ता दयानंद डोंगरे
तसेच
२) रुद्राक्ष संतोष तांबोळकर
यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने संस्था अध्यक्ष,संस्थेचे सचिव,मुख्याध्यापक व शिक्षक,कर्मचारी यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव बबनराव भोसले उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुरज भोसले,शिवरुद्र भैय्या पाटील तसेच अन्य प्रमुख मान्यवर शिक्षक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या