Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूर विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांना पडत आहेत आमदारकीचे स्वप्न


तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या सध्याच्या परिस्थितीवर विशेष लेख

तुळजापूर:आगामी विधानसभा निवडणुक महायुती व महाविकास आघाडी यांच्यातच होणार असल्याची दाट शक्यता आत्ताच्या परिस्थितीनुसार वाटत आहे.त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षातील सर्वच इच्छुक उमेदवारांना संधी मिळणार असे वाटत आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवाराचे प्रत्येक गावामध्ये जोरबैठका वाढल्या आहेत. सध्याची तुळजापूर तालुक्याची परिस्थिती पाहता तुळजापूर विधानसभेसाठी चौरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने सर्वच इच्छुक उमेदवारांना आमदारकीचे स्वप्न पडायला सुरुवात झाली आहे.सर्वच राजकीय पक्षांनी तुळजापूर विधानसभा जागा आपलीच आहे असा दावा केला असल्यामुळे सर्वच पक्षाकडून दिवसेंदिवस इच्छुक उमेदवाराची यादी वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

तुळजापूर विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून धैर्यशील पाटील,सक्षणा सलगर,जीवनराव गोरे,अशोक जगदाळे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने प्रतिक रोचकरी हे फिल्डिंग लावत आहेत.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हा पहिल्यापासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळे ही जागा काँग्रेस पक्ष सोडून घेईल का? जर ही जागा काँग्रेस पक्षाला मिळाली तर उमेदवार माजी मंत्री असतील का माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असतील याची चर्चा होत आहे.

सध्याच्या तर परिस्थितीनुसार महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचेच नाव आघाडीवर आहे व त्यांच्याकडून प्रत्येक गाव भेटी दौरा सुद्धा चालू झाला आहे.

मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी तुळजापूर नगर परिषदेवर पंधरा वर्षापासून ज्याचा धबधबा आहे असे तुळजापूर तालुक्याचे युवा नेते विनोद पिटू भैया गंगणे यांना तुळजापूर शहरातील माजी नगरसेवकांनी समर्थन करत निवडणूक लढवण्यासाठी गळ घातली आहे.तसेच गणपती विसर्जनच्यापूर्वी यावर माझा निर्णय मी जाहीर करणार असल्याची भूमिका विनोद पिटू भैया गंगणे यांच्या वतीने सांगण्यात आली आहे.विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे ते समर्थक आहेत.आता विनोद पिटू भैया गंगणे हे काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण तुळजापूरकरांचे लक्ष लागले आहेत.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात चांगला दबदबा असलेले देवराज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवानंद भाऊ रोचकरी हे सुद्धा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.तसेच त्यांच्याकडून सुद्धा तालुक्यात प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे.तुळजापूर तालुक्यात त्यांची स्वतंत्र वोट बँक असल्याचे सांगितले जात आहे.

अपक्ष उमेदवार म्हणून तुळजापूर तालुक्यातील हगलूर येथील सुपुत्र अण्णासाहेब दराडे हे सुद्धा अपक्ष विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे शक्ती प्रदर्शन करून तसेच विद्यमान आमदार व माजी आमदार यांचा टँकरद्वारे उजनी धरणातून पाणी आणून निषेध व्यक्त करून आपली उमेदवारी जाहीर केली आहे.तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला निवडून दिल्यास मी पुढील पाच वर्षात उजनी धरणांचे पाणी आपल्या तालुक्यात आणणार व मी आमदार झाल्यास माझी संपूर्ण पगार ही तालुक्यातील प्रत्येक गावात संग्रहालय बांधण्यासाठी देणार असे वचन सुद्धा त्यांनी दिले आहेत.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अण्णासाहेब दराडे हे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून इच्छुक होते.पण त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर अचानकपणे त्यावेळी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गट नेते महेंद्र धुरगूडे यांना प्रहार पक्षाने उमेदवारी दिली होती.त्यानंतर अण्णासाहेब दराडे हे पुणे येथे आपल्या व्यवसायासाठी गेले होते.त्यानंतर ते पुन्हा परत पाच वर्षानंतर येऊन अपक्ष निवडणूक लढवणार असे जाहीर केल्यानंतर तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये भेट दौरा चालू केला आहे.गावातील प्रत्येक ग्रामस्थांना अण्णासाहेब दराडे हे नवीन असल्यामुळे तसेच त्यांना मानणारा वर्ग जास्त नसल्यामुळे प्रचार करण्यासाठी अण्णासाहेब दराडे यांना गावोगावी जाऊन प्रचार करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकी पर्यंत अण्णासाहेब दराडे हे मतदार राजांचे कसे मन वळवणार हेही पाहणे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्याची परिस्थिती पाहता महाविकास आघाडीकडून तुळजापूर विधानसभा मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे राहतो व कोणत्या उमेदवाराला विधानसभा लढवण्यासाठी संधी मिळते याकडे संपूर्ण तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे.

जुबेर शेख 
मुख्य संपादक 
वीर महाराष्ट्र न्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या