Ticker

6/recent/ticker-posts

छावा संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर


प्रतिनिधी: फिरोज पटेल

उमरगा: उमरगा येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आले. 

छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार संघटनेचे धाराशिव युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने यांच्या शुभहस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी धाराशिव जिल्हा युवक उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पंढरीनाथ पाटील,युवक जिल्हा कार्याध्यक्षपदी निखिल शिवाजीराव रणखांब,उमरगा तालुका अध्यक्षपदी महावीर व्यंकटराव पाटील,युवक तालुका अध्यक्षपदी अनिकेत जीवनराव औरादे यांची निवड करण्यात आली व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. 

या कार्यक्रमास चिंचकोट गावचे उपसरपंच बापू पुरी,बाळू कारभारी,गणेश गायकवाड,अतुल भोसले,हिराजी पवार,हिराजी माने,बालाजी चौधरी तसेच छावा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या