Ticker

6/recent/ticker-posts

पुणे एअरपोर्टवर राष्ट्रीय नेमबाज रफिक लतीफ खान यांच्या पाठपुरावानंतर अखेर १०० फुटी तिरंगा फडकला


प्रतिनिधी : सिकंदर शेख

पुणे: पुणे येथील एअरपोर्ट येथे हवाई दलाचे सैनिक प्रशिक्षण पूर्ण करून देशाच्या सुरक्षा मध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.या एअरपोर्टवर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. 

त्या अनुषंगाने राष्ट्रीय नेमबाज रफिक लतीफ खान यांनी एअरपोर्टवर किमान १०० फूट राष्ट्रध्वज बसवावे असे निवेदन दिले होते व या निवेदनाची वेळेवर त्यांनी पाठपुरावा देखील केला होता. 

त्या निवेदनाची शेवटी एअरपोर्ट प्रशासनाने दखल घेऊन भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त एअरपोर्टच्या परिसरामध्ये १०० फूटच्या आसपासचा तिरंगा फडकवण्यात आला व त्या तिरंगा सलामी देखील देण्यात आली. 

राष्ट्रीय नेमबाज रफिक लतीफ खान यांच्या मागणीला यश आल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या प्रशासन व अधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात आले.

त्यानंतर नेमबाज रफिक लतीफ खान यांनी देशाच्या प्रत्येक एअरपोर्टवर १०० फुटी तिरंगा बसविण्यात यावे अशी मागणी सुद्धा केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या