Ticker

6/recent/ticker-posts

युवक जिल्हाध्यक्ष भरत सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात शिवस्वराज याञेचे लामजना पाटी येथे जेसीबीतुन फुलांची उधळन करत स्वागत


प्रतिनिधी : अशोक गरड 

औसा: लातुर जिल्हा राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भरत भाऊ सुर्यवंशी यांच्या वतीने संबंध राज्यभर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व संसदरत्न खा,सुप्रीया सुळे यांच्या नेञत्वात चालु असलेली शिवस्वराज्य याञा धाराशिव ते उदगीर जात असताना लामजना पाटी येथील छञपती शिवाजी महाराज चौक येथे याञेचे जोरदार स्वागत करण्यात आले.

शिवस्वराज याञेमध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्षा संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे,प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील,खा.आमोल कोल्हे,युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख,विध्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे सह मान्यवरांनी लामजना पाटी येथील अष्वारुढ शिवछञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच पुजन केले.

यावेळी जेसीबीतुन फुलांची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोशात याञेचे स्वागत करण्यात आले. 

यावेळी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे,जिल्हा कार्याध्यक्ष रशीद शेख,युवक जिल्हाध्यक्ष भरत सुर्यवंशी,विधानसभा अध्यक्ष यशवंत भोसले,महिला तालुकाध्यक्ष सुनिता ताई भोसले,युवक तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव,युवक कार्याध्यक्ष वसीम बोपले, युवक विधानसभा अध्यक्ष अशोक गरड, आत्माराम साळुंखे, विनोद झिरमिरे, रोहन जाधव, निशांत पाटील, दत्तात्रय जाधव, शिराज शेख, रवी सुर्यवंशी, राजू पटेल मन्सुरी रुईकर लक्ष्मण पुरी शाम कदम, पाशा शेख, हरिदास कोळी, व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या