Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय स्वातंत्र्य दिन व वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले शालेय साहित्य व खाऊ वाटप


प्रतिनिधी : अहमद अन्सारी 

तुळजापूर: तुळजापूर येथे जय तुळजाभवानी निवासी शाळा येथे (दि.१५) रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त तसेच वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त तेथील शिकणाऱ्या मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील,युवक तालुकाध्यक्ष शरद जगदाळे,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तोफिक शेख,ज्येष्ठ नेते दिलीप नाना मगर,शहर उपाध्यक्ष मकसूद शेख,तुळजापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी भागवत सरआरपीआय प्रदेश उपाध्यक्ष संजय नाना शितोळे यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 

प्रमुख मान्यवरांचा सत्कार शाल,पुष्पगुच्छ देऊन वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या प्रतिनिधीच्या वतीने करण्यात आला.

त्यानंतर प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.मनोगत व्यक्त करताना त्यांनी असे सांगितले की,मागील दोन वर्षांपूर्वी तुळजापूरच्या धरतीवर एका युवकांनी वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेल सुरू केले त्याचे आज दोन वर्षे पूर्ण झाले. हे न्युज चॅनेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय होऊन अत्यंत प्रगतशील चॅनेलच्या यादीमध्ये वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे नाव घेतलं जात आहे.त्यांनी शेतकरी,कष्टकरी,मजूर या सर्व घटकांना न्यूज चॅनेलच्या मार्फत न्याय देण्याचे काम केले.असेच काम त्यांचे पुढील काळात सुद्धा चालू राहू अशी आशा व्यक्त केली व समस्त वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधींना द्वितीय वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील,ज्येष्ठ नेते दिलीप नाना मगर,युवक तालुकाध्यक्ष शरद जगदाळे,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तौफिक शेख,शहर उपाध्यक्ष मकसूद शेख,आरपीआय आठवले गटाचे कामगार प्रदेश उपाध्यक्ष संजय नाना शितोळे,तुळजापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी भागवत सर,वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक जुबेर शेख,महाराष्ट्र रफ्तार न्यूजचे मुख्य संपादक राहील पटेल,कार्यकारी संपादक वाहेद शेख,महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी राम थोरात,धाराशिव जिल्हा प्रतिनिधी अहमद अन्सारी,उमरगा तालुका प्रतिनिधी फिरोज पटेल,तुळजापूर तालुका प्रतिनिधी शहाजी नन्नवरे,श्याम ढेरे,रईस शेख,आफताब शेख,साहिल शेख परवेज शेख तसेच जय तुळजाभवानी निवासी शाळेचे सर्व शिक्षक,कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या