प्रतिनिधी : जुबेर शेख
उंब्रज: भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जि.प.प्राथमिक शाळा केंद्र उंडाळे येथे महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप यांचा वतीने उंब्रज गावचे टायगर ग्रुप अध्यक्ष पै.रवी भाऊ कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या सदस्यांच्या वतीने प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
त्यावेळी शाळेचे व्यवस्था कमिटी मधुकर पाटील यांच्या वतिने सूत्रसंचालन करण्यात आले.व राष्ट्रगीताने कार्यक्रमासाठी सुरुवात झाली.
पै.रविभाऊ कुडाळकर यांनी आपल्या भाषणातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना नतमस्तक करण्यात आले व त्याचबरोबर इथून पुढे येणारी युवा पिढी ही व्यसनाधीन होऊ नये व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले.
शाळेच्या वतीने पै.रविभाऊ कुडाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.व शाळेच्या व्यवस्थापकांनी आभार मांडून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.
त्यावेळी टायगर ग्रुप उंडाळे कार्याध्यक्ष श्री शुभम भाऊ आंबवडे,टायगर ग्रुप कराड कार्याध्यक्ष श्री सुरेश भाऊ पाटणकर,एक्का भाई जावळे,प्रकाश मोरे,शिरीष आंबवडे,अनिकेत जावळे,प्रमोद पाटील,अक्षय पाटील व टायगर ग्रुप मित्रपरिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या