प्रतिनिधी : फिरोज पटेल
उमरगा: उमरगा येथील ॲड.शितल चव्हाण फॉउंडेशन यांच्या वतिने नूतन पोलीस निरीक्षक सौ.अश्विनी भोसले यांचा उमरगा पोलीस ठाणे येथील कार्यालयात यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी ॲड.शितल चव्हाण,सिनेअभिनेता अजयकुमार देडे,फॉउंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव,उपाध्यक्ष व्यंकट उर्फ राजू भालेराव,ॲड.अर्चनाताई जाधव,ज्योती माने,यशोदा पवार,बबिता मदने,करीम शेख,विजय चितली,किशोर बसगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान ॲड.शितल चव्हाण यांनी प्रास्ताविक करून फॉउंडेशनच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती विषद करून उमरगा तालुका जातीय सलोखा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीशी सदैव राहत आलेला असून आमचा पण समाजशील कामामध्ये पाठिंबा राहील असे मत व्यक्त करून जबाबदार पदावर असताना प्रसंगी घेतलेला आपला कठोर निर्णय सामान्य लोकांचे हित पाहून पाळू परंतु विस्कटलेली घडी नीट बसवा अशी विनंती ॲड.शितल चव्हाण यांनी करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या