प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर: आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नव्याने बांधकाम होत असलेल्या बस स्थानकाला भेट दिली व शारदीय नवरात्र ३ आक्टोंबरला घटस्थापन होत असल्या कारणाने भाविक,शहर वासियांच्या दृष्टी कोणातुन शहरातील मध्यवर्ती असणारे बसस्थानक हे लवकर सुरु व्हावे यासाठी संबंधित काँट्रक्ट,एस.टी महामंडळाचे संभाजीनगर,धाराशीवचे सर्व अधिकारी यांची सर्कीट हाऊस (रेस्टहाऊस) येथे बैठक घेतली.
तसेच सदरील होत असलेल्या कामाची पहाणी समक्ष जागेवरती जाऊन केली.पुढील महिन्यापर्यंत लवकरात लवकर बस स्थानक हे भाविकांसाठी सुरु व्हावे.बाबत सुचना दिल्या तथा कामाच्या दर्जा बाबतही सांगीतले.
बैठकीस उपस्थित युवा नेते विनोद पिटु गंगणे,मा.नगराध्यक्ष सचिन रोचकरी,आनंद कंदले,सतिश दंडनाईक,नरेश अमृतराव,लखन पेंदे,सचिन पाटील,नरसिंग बोदले,राजेश्वर कदम,राजेश बच्चु शिंदे,माऊली भोसले,धैर्यशील दरेकर,रत्नदीप भोसले,आण्णाप्पा पवार आदी बैठकीस उपस्थित होते.
0 टिप्पण्या