Ticker

6/recent/ticker-posts

शिवस्वराज्य यात्रेची तुळजापूर येथे जय्यत तयारी:राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बॅनरबाजी त्याच बॅनरची तुळजापुरात जोरदार चर्चा.....


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक उमेदवारांनी बॅनरबाजी मधून केले मोठे शक्ती प्रदर्शन

प्रतिनिधी: जुबेर शेख 

भाजपचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची डोकेदुखी वाढणार का?

तुळजापूर:तुळजापूर येथे उद्या (दि.१४) रोजी शिवस्वराज्य यात्रा तुळजापूर येथे दाखल होत आहे.त्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संपूर्ण तुळजापूर शहरांमध्ये बॅनर लागलेले पाहायला मिळत आहेत.त्यातच उद्योजक अशोक जगदाळे यांनी त्यांच्या समर्थकाचे बॅनर लावून त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी चिन्ह लावून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची इच्छुक उमेदवार दिसत आहे. 

तुळजापूर विधानसभा लढवण्यासाठी अशोक जगदाळे इच्छुक असल्याचे माहित होताच तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता.तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी सुद्धा संपूर्ण शहरांमध्ये बॅनरबाजी करून तुळजापूर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे प्रसारमाध्यमासमोरच सांगितले होते.त्यांनीही मोठ्या प्रमाणात तुळजापूर शहरांमध्ये शक्ती प्रदर्शन केले आहे. 

त्यामुळे येणाऱ्या तुळजापूर विधानसभेसाठी भाजपचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची डोकेदुखी वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

तुळजापूर विधानसभेसाठी धाराशिव तालुक्यातील ७२ गावाचा समावेश हा तुळजापूर विधानसभेसाठी आहे.त्याच ७२ गावांमध्ये सक्षणा सलगर यांचा चांगलाच धबधबा असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यांच्याच काही पदाधिकाऱ्यांमधून पक्षश्रेष्ठीने सक्षणा सलगर यांना विधानसभेची तयारी करण्यासाठी सांगितले आहे असे सुद्धा सांगण्यात येत आहे. 

त्यामुळे कुठे ना कुठे अशोक जगदाळे यांची उमेदवारीसाठी कोंडी होताना पाहायला मिळत आहे. तुळजापूर तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सक्षणा सलगर यांच्या पाठीमागे असल्यामुळे जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला भेटल्यास पक्षाचा उमेदवार हा सक्षणा सलगरच असणार आहे असे देखील सांगण्यात येत आहे.

तुळजापूर विधानसभा ही काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काही दिवसापूर्वीच मराठवाडा विभागीय बैठक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आले होती.त्यामध्ये तुळजापूर तालुक्यासाठी ९ उमेदवारांनी मुलाखत दिली आहे.प्रामुख्याने माजी आमदार मधुकरराव चव्हाण,काँग्रेस पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष धीरज पाटील,मुकुंद डोंगरे,देवराज मित्र मंडळाचे अध्यक्ष देवानंद रोचकरी अशा अनेक दिग्गजाने मुलाखती दिल्यामुळे काँग्रेस पक्ष तुळजापूर विधानसभा जागा लढणार का? हे बघावे लागणार आहे. सर्व दिग्गजानी मुलाखत दिल्यामुळे काँग्रेस पक्षामध्येही कुठे ना कुठे गटबाजी पाहायला मिळत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाला ही जागा सुटणार असे पदाधिकाऱ्यांच्या वतीने वेळोवेळी सांगण्यात येत आहे.त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाला सुटल्यास शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार कोण असणार याकडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या