विशेष लेख
प्रतिनिधी : फिरोज पटेल
उमरगा : उमरगा - लोहारा मतदारसंघाचे भूमिपुत्र असलेले तसेच राजकीय चळवळीत अभ्यासू ज्येष्ठ नेतृत्व असलेले प्रा.डॉ.संजय रामचंद्र कांबळे हे संपूर्ण उमरगा - लोहारा मतदारसंघात यांची नाव विविध उपक्रमाने चर्चेत कायम राहीले आहेत.
आपल्या मतदारसंघाचा विकास कसा होईल तिथल्या लोकांना काय अडचणी आहेत हे जाणून घेण्यासाठी सदैव तत्पर असतात व गोरगरीब लोकांना न्याय देण्याचे काम हे मागील १५ ते २० वर्षापासून करत आहेत.त्यांनी आपल्या राजकीय चळवळीमध्ये अनेक निवडणुका लढवून विजय सुद्धा झाले आहेत.तर विविध सोसायटी संस्थेवर ते अध्यक्षपद देखील भूषवले आहेत.
उमरगा - लोहारा मतदारसंघातून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या वतीने ते इच्छुक असल्याचेही समजत आहे.
मागील काही वर्षापासून त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये काम केल्यामुळे उमरगा - लोहारा मतदारसंघांमध्ये त्यांचे मोठे जाळे पसरलेले पाहायला मिळत आहे.तर त्यांच्या पाठीमागे अनेक कार्यकर्ते देखील असल्याने ही निवडणूक विरोधकांना अटीतटीची जाणार असल्याचे जनतेच्या वतीने सांगण्यात येत आहे.
माध्यमासोबत चर्चा करताना त्यांनी असे सांगितले की,उमरगा - लोहारा मतदारसंघातील जनतेने मला निवडून दिल्यास मी पुढील ५ वर्ष धर्मनिरपेक्षक विधानसभेचा सदस्य ( आमदार ) म्हणून काम करणार आहे.असे मत माध्यमासमोर प्रा.डॉ.संजय कांबळे यांनी आपले मत मांडले.
उमरगा - लोहारा मतदारसंघ हा कायम शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला पाहायला मिळत आहे.त्यातच मधल्या काळात शिवसेनेमध्ये दोन गट झाल्यामुळे उमरगा - लोहारा मतदारसंघात शिंदे गट व ठाकरे गट आमने सामने येण्याचे चित्र पाहायला मिळणार आहे.शिंदे गटातून विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले हे निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित असून त्यांना आव्हान देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने प्रा.डॉ.संजय कांबळे हे आव्हान देण्यासाठी तयार असल्याचे नागरिकाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
प्रा.डॉ.संजय कांबळे हे उमरगा - लोहारा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळताच विरोधकांमध्ये धसकी भरली आहे.येणाऱ्या काळातच उमरगा - लोहारा मतदारसंघासाठी उमेदवारांची नावे निश्चित होते.त्यानंतर कोणता उमेदवार उमरगा मधून आ.ज्ञानराज चौगुले यांना आव्हान देणार याकडेही सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.तसेच प्रा.डॉ.संजय कांबळे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने उमेदवारी मिळेल असे विश्वास त्यांना वाटत आहे.
प्रा.डॉ.संजय कांबळे यांच्या बद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया.👇🏻
• डॉ. संजय रामचंद्र कांबळे (एम.एस.सी.पी.एच.डी)
प्राध्यापक शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब
जिल्हा: धाराशिव
जन्म : २५/११/१९६८ धर्म: बौद्ध
वडील- कालकथीत. रामचंद्र कृष्णाजी कांबळे
स्वातंत्र्य सैनिक हैद्राबाद मुक्ती संग्रामामध्ये ८ महिने गुलबर्गा जेलमध्ये आदर्श सरपंच तुगांव ता. उमरगा जि. धाराशिव (१९७४ ते १९७८ (पुन्हा २००८ ते २०१२ पर्यंत)
१) मौजे तुगांव गावठाण नं १ ता. जमरगा जि. धाराशिव. २) ३/१२४० कल्पना नगर कळंब ता.कळंब जि.धाराशिव.
Mo. 94224 67425/9665267676
Email id. drsanjaykamble007@gmail.com
भूषवलेली पदे
• संचालकः धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लिमिटेड धाराशिव (उस्मानाबाद) (२०२२)
• सिनेट सदस्यः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) (२०२३)
• संचालकः ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा ता. कळंब (२०२३)
• जिल्ह्यामध्ये व जिल्ह्याबाहेर महाविद्यालय व उच्च माध्यमिक माध्यमिक व प्राथमिक अशा एकूण २० शाखा आहेत.
• अध्यक्षः छत्रपती शिवाजी विद्यालय करंजकला (२०१५) एक माध्यमिक विद्यालय
• अध्यक्षः भीम ज्योत क्रीडा मंडळ तुगांव तालुका उमरगा (१९९८)
राजकीय/सामाजिक
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय मराठवाडा प्रदेश (२०२२ पासून)
अध्यक्षः • अध्यक्षः भारिप बहुजन महासंघ जिल्हा उस्मानाबाद (१९९८-२००८)
•अध्यक्षः
प्राध्यापक संघटना उस्मानाबाद जिल्हा (२०१२ ते बालू)
•कार्यर्याध्यक्षः
३० वे अस्मिता दर्श साहित्य संमेलन कळंब (२०११)
• स्वागताध्यक्षः
मार्गदर्शक : ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे
पहिले अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन कळंब
संमेलन अध्यक्ष उत्तम कांबळे ज्येष्ठ साहित्यिक (२०१२)
भारतीय विद्यार्थी संसद जिल्हा उस्मानाबाद (१९८९ ते १९९१)
• अध्यक्षः
निवडणुकाः
• उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि धाराशिव (उस्मानाबाद,2022 ते 2027) विजयी
• अधिसभा सदस्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) २०२३ ते २०२८
• ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचालक बिनविरोध निवड २०२३ ते २०२८ (या संस्थेचे एकूण २० शाखा
कार्यरत आहेत त्यामध्ये एक वरिष्ठ महाविद्यालय,५ कनिष्ठ महाविद्यालय व १० माध्यमिक व प्राथमिक विद्यालय)
• जिल्हा परिषद गट येणेगुर,ता.उमरगा (२०१२,राष्ट्रवादी काँग्रेस)
• विधानसभा कळंब (२००४ भारिप बहुजन महा.)
आंदोलन सहभाग व नेतृत्वः
• कृष्णा खोऱ्यातील २१ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळाला पाहिजे यासाठी अटक गुन्हा नोंद (२००३)
• जलसमाधी आंदोलनः कळंब शहरासाठी शहरासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा
होण्यासाठी आंदोलन (२००२)
• शेतकऱ्यांच्या कापसाचे चुकारे वेळेवर यासाठी आंदोलन.
• मागासवगीय विद्याथ्यांची शिष्यवृत्ती वाढ आंदोलन
• दुष्काळी भागाची सर्वसाधारण विद्यार्थ्यांची फीस माफ होण्यासाठी आंदोलन
• प्राध्यापकाच्या प्रश्नावर आंदोलनामध्ये सहभाग व नेतृत्व
येणाऱ्या विधानसभेमध्ये उमरगा - लोहारा मतदारसंघातून प्रा.डॉ.संजय कांबळे यांना उमेदवारी मिळाल्यास एक अभ्यासू व अनुभवी उमेदवार हे विरोधकांना आव्हान देणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
0 टिप्पण्या