प्रतिनिधी : फिरोज पटेल
उमरगा: उमरगा येथे ॲड.शितल चव्हाण फाउंडेशन व प्रा.शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमानाने (दि.१५) रोजी ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.
उमरगा विधीज्ञ मंडळाचे नवनिर्वाचित कोषाध्यक्ष ॲड.कृष्णा पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून त्यांच्यासोबत स्वातंत्र लढ्यातील सर्व स्वातंत्र्य संग्रामातील महापुरुषांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी प्रा.युसुफ मुल्ला,उमरगा विधिज्ञ मंडळाचे कोषाध्यक्ष ॲड.कृष्णा पाटील,ॲड.अर्चनाताई जाधव,ॲड.वसीम वाडीकर,ॲड.मयूर गायकवाड,प्रदीप चौधरी,विद्यासागर गायकवाड,किशोर बसगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या