Ticker

6/recent/ticker-posts

बदलापूर येथे शाळेतील ३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा द्या:तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील


प्रतिनिधी: जुबेर शेख

तुळजापूर: तुळजापूर येथे ( दि.२० ) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तुळजापूर तालुक्याच्या वतीने तुळजापूर तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले. 

निवेदनात असे सांगण्यात आले की,महाराष्ट्र राज्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने देशात महाराष्ट्र नंबर १ वर आले आहे.त्यावर आपण लक्ष घालावे तसेच बदलापूर मध्ये शाळेत लहान ३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केलेल्या आरोपींना तात्काळ फाशी शिक्षा द्यावी.तसेच बदलापूर येथे जमावावर लाटी चार्ज करण्यात आला आहे.त्याची चौकशी करण्यात यावी.अशा मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे. 

या निवेदनावर तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील,युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते श्याम पवार,रुबाब पठाण,पवन गुरव,शहाजी नन्नवरे,ज्येष्ठांचे जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील,रोहित देशमुख,गोविंद देवकर,अनिल कदम, इब्राहिम इनामदार,रमेश मुळे,समाधान धाकतोडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या