प्रतिनिधी: फिरोज पटेल
उमरगा: उमरगा येथे (दि.१९) रोजी समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे सांगण्यात आले की,रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज सरलाबेट यांनी मौजे पंचाळे ता. सिन्नर जि. नाशिक या ठिकाणी सप्ताह दरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदाय समोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरुची प्रतिमा मलिन होईल असे जाणीव पुर्वक प्रबचन केले आहे. की भारतात एक काटीपेक्षा आंधक मुस्लिमांनी इस्लाम सोडला आहे. दहा बीस वर्ष ज्यांनी मोलाना म्हणुन काम केले आहे. त्यांनी ईस्लामचा सुक्षम अभ्यास केला असता त्यांना यात अन्याय अत्याचार शिवाय काहीही आढळुन न आल्याने त्यांनी ईस्लाम धर्म सोडुन दिला आहे. मोहम्मद पैगंबर यांनी वयाच्या ५० व्या वर्षी सहा वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला. ज्यांची आदर्शच अत्याचीरी आहेत त्यांच्याबाबत अजुन काय सांगायचे अशा स्वरुपात त्या प्रवचनामध्ये मुस्लिम धर्माबाबत मोठ्या प्रमाणावर अनेक वक्त्ये रार्मागरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर यांनी केली आहेत. रामगिरी गुरु नारायणं गिरी महाराज यांच्या या वक्त्च्यामुळे समस्थ मुस्लीम समाजाचे भावना दुखवल्या गेल्या आहेत. रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज तसेच कोलकत्ता येथे महिला डॉक्टरचा बलात्कार करुन क्रूर हत्या करणा-या नराधमाचर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच बंगलादेश येथे हिंदु समाज बांधवावरील झालेल्या अत्याचार विरोधात जाहीर निषेध व्यक्त करीत आहेत.
रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्त्यामुळे मुस्लिम समाजाचे भावना दुखवल्या गेल्या आहेत. त्यामुळे या महाराजावर व कलकत्ता येथे महिला डॉक्टराची हत्या करणा-या नराधमावर कठोर कार्यवाही करुन अटक करण्यात यावी. असे संबंधीत राज्य शासनाने आदेश द्यावे. तसेच बांगलादेशात आलप संख्याक्याक हिंदु बांधवावर तेथिल समाज कंटकाळुन होत असलेल्या हल्ले तात्काळ थांबवण्यासाठी केंद्रसारकारने पुढकार घ्यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे राज्यपाल यांना करण्यात आली आहे.
या निवेदनावर उमरगा - लोहारा तालुक्यातील समस्त मुस्लिम बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या