प्रतिनिधी : फिरोज पटेल
उमरगा: उमरगा येथे युवक काँग्रेस धाराशिव जिल्हाच्या वतीने (दि.१९) रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनाद्वारे असे सांगण्यात आले की,पश्चिम बंगाल येथील कोलकत्ता येथील मेडिकल कॉलेजमध्ये शिकाऊ महिला डॉक्टर यांच्यावर झालेल्या बलात्कार व हत्या करणाऱ्या दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी.
तसेच सन २०२३ - २४ मधील शेतकऱ्यांना अनुदान वाटप मधील ई पिक पाहणीची अट रद्द करून सरसकट सर्व शेतकऱ्यांना अनुदान देण्यात देण्यात यावे.
अशा विविध दोन मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे यांच्या वतीने देण्यात आले आहे.
या निवेदनावर युवक काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या