Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी भिल्ल समाजाच्या सर्वांना जात पडताळणी करून द्यावे:सचिव अशोक सिरवाटे यांची निवेदनाव्दारे मागणी

प्रतिनिधी : अशोक गरड 

लातूर:लातूर येथे भिल्ल समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने आदिवासी भिल्ल समाजाच्या सर्वांना जात पडताळणी करून मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 

निवेदनात असे सांगण्यात आले की आदिवासी भिल्ल समाज हा गेल्या पन्नास वर्षापासून लातूर जिल्ह्यात राहत आहे. आमच्या समाजात शिक्षित युवकांना नोकरी भेटत नाही.आमचा समाज मजुरी करून जगत आहे. 


तरी आपणास विनंती करण्यात येते की आमच्या समाजाच्या जात पडताळणी करून देण्यात यावे जेणेकरून एखाद्या नोकरीसाठी गेले असल्यास तिथे अडचण निर्माण होणार नाही आमच्या समाजामध्ये शिक्षक युवक आहेत त्यांना शासकीय योजनेचा लाभ भेटत नाही ते बेरोजगार आहेत आमच्या समाजाच्या जास्तीत जास्त युवक हे शिक्षित आहे. आमच्या समाजामध्ये युवकांना उच्च शिक्षण घेण्यासाठी जात पडताळणी ची आवश्यकता भासत आहे त्यामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. 

तरी आपणास विनंती आहे की आमच्या समाजाच्या जात पडताळणी करून देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. 

निवेदनावर आदिवासी भिल्ल सेवाभावी संस्थेचे सचिव अशोक मोगलप्पा सिरवाटे यांची स्वाक्षरी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या