प्रतिनिधी : अशोक गरड
औसा:औसा (दावतपुर)आज दिनांक 23/8/24 रोजी कमलाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही विविध क्षेत्रात विविध उपक्रम राबवित आहे. तसेच दावतपुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे कमलाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला संस्थेच्या स्व.निधीतून आणि माध्यमातून एक मूल एक झाड अशी संकल्पना घेऊन विद्यार्थी संख्यानुसार झाड वितरण व लागवड करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.बी.सी चव्हाण,सहशिक्षक श्री.पी.व्हि.बोयेने (प्रा.प),श्री.डी.ए.कदम.श्री.डी.जी.ठाकूर,श्री.पी. व्हि.सेलुकर,श्री.एस.जी. बिराजदार,श्रीमती एम.जे.मोरे तसेच संस्थेचे सचिव श्री.प्रमोद सुरवसे,श्री. विनोद सुरवसे,तसेच गावकरी श्री.आनंद बिराजदार,श्री.अजगर शेख,श्री सुनील दाने व गावकरी मंडळी इत्यादी उपस्थित होते.
0 टिप्पण्या