प्रतिनिधी : अशोक गरड
औसा:कोलकाता,बदलापूर,अकोला,कोल्हापूर,ठाणे आणि चाकूर येथे गेल्या काही दिवसात विद्यार्थ्यांवर लैंगिक शोषणाच्या,बलात्कराच्या आणि हत्येच्या घटना घडल्या आहेत.
आज मुली कुठेही सुरक्षित राहिल्या नाहीत.महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांकडून (दि.२४) रोजी औसा तहसील कार्यालयाच्या समोर निषेध आंदोलन करण्यात आले.त्या अत्याचारी नराधमास कठोर शिक्षा व्हावी यासाठी तहसीलदारा मार्फत शासनास निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष भरत सुर्यवंशी,जिल्हा कार्याध्यक्ष रशीद शेख,तालुकाध्यक्ष शामराव साळुंके -पाटील,विधानसभा अध्यक्ष यशवंत भोसले,शहराध्यक्ष सनाउल्ला शेख,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दातोपंत सूर्यवंशी,शहराध्यक्ष अझहर शेख,शकील शेख,मंजुषाताई हजारे,शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख आबासाहेब पवार,जयश्रीताई उटगे,संजय उजलंबे,राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष
बाळासाहेब जाधव,युवक कार्याध्यक्ष वसिम बोपले,युवक विधानसभा अध्यक्ष अशोक गरड,विधानसभा सचिव मन्सूर रुईकर,विधानसभा उपाध्यक्ष राजू पटेल,विधानसभा संपर्क प्रमुख राजेंद्र जोगे,काँग्रेसचे युवक विधानसभा अध्यक्ष मुकेश बिदादा,आत्माराम साळुंखे,खुदमिर मुल्ला तसेच महविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या