प्रतिनिधी:अशोक गरड
औसा:औसा येथे संभाजी सेनेच्या वतीने (दि.२७) रोजी तहसीलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे सांगण्यात आले की,लातूर जिल्ह्यातील भेटा येथील ७० वर्षीय हिंदू महिलेवर बलात्कार करून क्रुर पद्धतीने हत्या करून प्रेता बरोबर चार दिवस लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी व त्याच्या साथीदारास जलद गती न्यायालयात प्रकरण चालवून तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी.
लातूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनावर सर्वसामान्य जनतेचा विश्वास राहिला नाही पोलीस फक्त स्टलमेंट करणे,आरोपीला पाठीशी घालण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.तरी सदरील घटना खूप गंभीर असून त्यामध्ये दोन्ही समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी सदरील घटनेच्या तपासामध्ये व इतर आरोपीचा समावेश असण्याची शक्यता आहे.कारण सदर घटनेमध्ये महिलाही हिंदू धर्माचे असून तिच्यावर हिंदू असल्याच्या कारणाने अत्याचार व हत्या केली आहे हे स्पष्ट दिसत आहे.तरी इतर आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्याचे स्वरूप न आणण्यास संभाजी सेनेच्या वतीने त्रीव आंदोलन करण्यात येईल.यावेळी याची सर्वस्व जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असा इशारा संभाजी सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
या निवेदनावर औसा तालुकाध्यक्ष मनोज गरड,धर्मराज पवार,विलास लंगर,राजेंद्र तोवर,योगेश गिरी,असलम खान पठाण,जयराज डावकरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या