प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर:धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका २०२५ च्या पार्श्वभूमीवर दि. ३१ ऑक्टोबर रोजी तुळजापूर येथे काँग्रेस पक्षाची भव्य आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व जबाबदार व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवडणुकीच्या तयारीला प्रारंभ केला.
बैठकीचे अध्यक्षस्थान धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. धीरजभैय्या पाटील यांनी भूषवले. या वेळी त्यांनी सांगितले की,“आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीने लढवणार आहे. ग्रामविकास आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेसची भक्कम भूमिका जनतेपर्यंत पोहोचवून सत्तेपर्यंत पोहोचू.”
बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. अस्मिता ताई शहापूरकर, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विश्वास आप्पा शिंदे, तालुकाध्यक्ष रामदादा आलुरे, जिल्हा किसान काँग्रेस अध्यक्ष दिलीप दादा भोकरे, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, तसेच काटे गुरुजी, तात्यासाहेब शिंदे, कचरे सर, शहबाज काझी, उमेश राजे निंबाळकर, जनसेवक अमोल भैया कुतवळ, धनंजय राऊत, बालाजी आप्पा नरवडे, यांच्यासह जिल्हा परिषद माजी सदस्य बालाजी भाऊ बंडगर, प्रकाश चव्हाण, सयाजी मालक देशमुख, रणजीत भैया इंगळे, आनंद मालक जगताप, सीताराम दादा पाटील, संदीप सुरवसे, चंदू बनसोडे, विजय क्षीरसागर, संजय गुंजुटे, ज्ञानेश्वर साळवे, आबेदिन कुरेशी, गजेंद्र कदम, क्षितिज नरवडे, इमाम शेख, गौरीशंकर नकाते, साधू मुळे, देवकुळे गुरुजी, नाना शितोळे, गजेंद्र चाफे, विनायक जाधव, आप्पा डोंगरे, विजय डोंगरे, जुबेर शेख आदींची उपस्थिती होती.
बैठकीत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात काँग्रेसची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेबद्दल जबाबदारी देण्यात आली असून नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
नवीन नियुक्त्या
तुळजापूर तालुका उपाध्यक्ष : गोपाळ रघुनाथ गोरे
तुळजापूर तालुका युवक सरचिटणीस : ईश्वर पारप्पा राजमाने
तुळजापूर युवक काँग्रेस तालुका सरचिटणीस : श्रीधर कदम
तुळजापूर तालुका सरचिटणीस : दीपक संपतराव देशमुख
किसान काँग्रेस तुळजापूर तालुका उपाध्यक्ष : प्रशांत अभिमान शिंदे
अखेर बैठकीत कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीमुळे धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची निवडणुकीसाठीची तयारी अधिक जोमात सुरू झाल्याचे स्पष्ट दिसून आले.

0 टिप्पण्या