Ticker

6/recent/ticker-posts

नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर तुळजापूर काँग्रेसची भव्य आढावा बैठक उत्साहात संपन्न

 


प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : आगामी तुळजापूर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने आज तुळजापूर शहरात भव्य आढावा बैठक घेण्यात आली. शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवा कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे बैठकीचे वातावरण उत्साहवर्धक बनले.


या बैठकीत ज्येष्ठ नेते माधवराव (अण्णा) कुतवळ, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. धीरज भैय्या पाटील, जनसेवक अमोल भैय्या कुतवळ, तुळजापूर शहर काँग्रेस अध्यक्ष भारत भाऊ कदम, माजी नगरसेवक अमर भाऊ मगर, अशोक इंगळे, नितीन आबा पाटील, नागनाथ भाऊ भांजी, रसूल बागवान, श्रीकांत धुमाळ, रंजीत भैया इंगळे, आनंद मालक जगताप, सुदर्शन वाघमारे आणि बालाजी तट यांची प्रमुख उपस्थिती होती.


बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शहर काँग्रेसची संघटनात्मक तयारी, कार्यकर्त्यांचे सक्रिय योगदान, तसेच मतदारांपर्यंत पक्षाची धोरणे व विकासाची भूमिका पोहोचवण्यावर सविस्तर चर्चा झाली.


ज्येष्ठ नेते माधवराव कुतवळ यांनी या प्रसंगी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की — “तुळजापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसच सक्षम पर्याय आहे. कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केल्यास आगामी निवडणुकीत निश्चितच विजय आपलाच असेल.”


बैठकीदरम्यान शहर काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले —


अल्पसंख्याक शहराध्यक्ष – युसूफ नजीर शेख


ओबीसी सेल शहराध्यक्ष – श्रीकांत मोहनराव रसाळ


युवक शहर उपाध्यक्ष – ओंकार संतोष लोंढे


मागासवर्गीय युवक शहराध्यक्ष – प्रमोद काकासाहेब कांबळे


युवक शहर संघटक – गणेश विजयकुमार अमृतराव


अल्पसंख्याक युवक शहराध्यक्ष – अब्दुल वहाब नजमुद्दीन शेख


शहर संघटक – संजय हरिश्चंद्र सजन


या नियुक्त्यांमुळे शहर काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


बैठकीच्या शेवटी सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखाने निर्धार व्यक्त केला —


“जनतेचा विश्वास हेच आमचं बळ, तुळजापूरच्या प्रगतीसाठी काँग्रेस परिवार सज्ज आहे!”




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या