Ticker

6/recent/ticker-posts

आगामी निवडणुकांसाठी शिवसेना सज्ज — स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त करत शिवसैनिक एकवटले!

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार,मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत तुळजापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भव्य आढावा बैठक पार पडली.जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी,कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवडणुकीच्या तयारीचा जोश दाखवला.


या बैठकीस उपनेते ज्ञानराज चौगुले,सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते,जिल्हा प्रमुख मोहन पणुरे,लोहारा तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील,महिला जिल्हाप्रमुख मीनाताई सोमाजी,तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव,शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख गणेश नेपते,शहर प्रमुख बापूसाहेब भोसले,शहर उपप्रमुख रमेश चिवचिवे,शहर संघटक नितीन मस्के,तसेच अमरराजे परमेश्वर,गणेश पाटील,संजय लोंढे,रितेश जावळेकर,निखील अमृतराव आदी मान्यवर उपस्थित होते.


बैठकीत आगामी निवडणुकीची तयारी,पक्ष संघटनाची बळकटीकरण आणि जनसंपर्क वाढवण्यावर सविस्तर चर्चा झाली.उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवण्यास सज्ज असल्याचा निर्धार व्यक्त केला.


या वेळी मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,“शिवसेना ही कार्यकर्त्यांच्या ताकदीवर उभी आहे.जो निर्णय पक्षश्रेष्ठी देतील, त्यानुसारच पुढील दिशा ठरेल.सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करून प्रत्येक गावात पक्षाचा झेंडा फडकवावा.”


तसेच या बैठकीत तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,“पक्षाने जर स्वबळाचा नारा दिला,तर तुळजापूर तालुक्यातील सर्व ठिकाणी उमेदवार देण्यासाठी शिवसेना पूर्णतःसज्ज आहे.प्रत्येक जागेवर उमेदवारांची चाचपणी करण्यात आलेली आहे.आम्ही फक्त पक्षश्रेष्ठीच्या आदेशाची प्रतीक्षा करत आहोत.आदेश मिळताच आम्ही रणनिती आखून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत.”


बैठकीचा समारोप जयघोष, टाळ्यांचा कडकडाट आणि “जय भवानी,जय शिवाजी” च्या घोषणांनी झाला.या बैठकीतून शिवसेनेचा उत्साह आणि संघटनशक्ती पुन्हा एकदा दिसून आली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या