Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकारावर चाकूहल्ला; नळदुर्ग हादरला,राजकीय षडयंत्राची चर्चा रंगली!

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : नळदुर्ग येथील स्थानिक पत्रकार आयुब शेख यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने नळदुर्ग शहर हादरले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चातुर्याने कारवाई करत मुख्य आरोपी अजहऱ मैनुद्दीन शेख (वय ३८, रा. नळदुर्ग) याला जेरबंद केले असून,त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस कस्टडीत पाठविण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार दि. २१ ऑक्टोबर रोजी साडेतीनच्या सुमारास बसस्थानकाजवळील गीरी हॉटेलसमोर ही थरकाप उडवणारी घटना घडली.आरोपी अजहऱ शेख याने धारदार शस्त्राने जीव घेण्याच्या उद्देशाने पत्रकार आयुब शेख यांच्यावर हल्ला केला.गंभीर जखमी अवस्थेत आयुब शेख यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्यात आरोपी हातात चाकू घेऊन उभा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.या पार्श्वभूमीवर राजकीय षडयंत्राचा संशय गडद होत चालला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम 109, 115(2), 352, 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान या प्रकरणातून अजून धक्कादायक खुलासे उघड होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली जात आहे.


दरम्यान,स्थानिक नागरिक आणि पत्रकार संघटनांकडून या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, “पत्रकार सुरक्षित नाही, तर लोकशाहीही असुरक्षित!”अशा तीव्र शब्दांत प्रतिक्रिया उमटत आहेत.


नळदुर्ग हादरला — हल्लेखोर गजाआड! व्हिडिओ पोलिसांच्या ताब्यात; राजकीय धागेदोरे तपासात!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या