Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेनेचा दिवाळी दिवशीही शाखा उद्घाटनाचा धमाका.!काक्रंबा येथे तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या हस्ते शाखेचे भव्य उद्घाटन

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : दिवाळीच्या पाडव्याच्या मंगलमय दिवशीही शिवसेनेचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार,पक्षाचे सचिव संजय मोरे,उपनेते ज्ञानराज चौगुले,जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक,सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते व धाराशिव जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे शिवसेनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.


या कार्यक्रमाचे उद्घाटन तुळजापूर तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख गणेश नेपते,शहाजी हक्के,सौरभ भोसले,गणेश पाटील,भुजंग मुकेरकर,निखील अमृतराव तसेच शाखाप्रमुख,उपप्रमुख,सचिव,कोषाध्यक्ष आणि स्थानिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दिवाळीच्या शुभमुहूर्तावर झालेल्या या शाखा उद्घाटनामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.गावातील तरुणांनी “जय शिवसेना!”च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. 


कार्यक्रमात बोलताना तालुकाप्रमुख अमोल जाधव म्हणाले की,“शिवसेना ही फक्त राजकीय पक्ष नसून लोकसेवेचा संकल्प आहे.प्रत्येक गावात शाखा स्थापन करून शिवसेनेची विचारधारा घराघरात पोहोचवायची आहे.जनतेच्या समस्या समजून घेत त्या सोडविण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत.”


कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखाप्रमुखांनी केले,तर आभार प्रदर्शन शाखा सचिवांनी मानले.


या उद्घाटनाने तुळजापूर तालुक्यातील शिवसैनिकांचा उत्साह द्विगुणित झाला असून पुढील काळात आणखी काही गावांमध्ये शाखा सुरू करण्याची माहिती तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी दिली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या