Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षकडून अशी अपेक्षा नव्हती,आजचा प्रकार निंदनीय:मा.नगरध्यक्ष सचिन रोचकरी


प्रतिनिधी : जुबेर शेख

तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील मौजे सिंदफळ येथे आज जो प्रकार झाला त्याबद्दल तुळजापूर शहराचे माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी असे सांगितले की,स्वतःच्या पक्षात काम करावे दुसरे काय करतातं हे बघण्या पेक्षा,तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण प्रकल्पाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जात असताना तुमच्या पोटात दुखायचे कारण काय? 

आदरणीय डॉ.पद्मसिंह पाटील यांनी आपली राजकीय ताकद पणाला लावून हा प्रकल्प मंजूर करून घेतला आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळण्याचा मार्ग सोपा झाला आहे.डिसेंबर महिन्यात पश्चिम महाराष्ट्रातील पाणी तुळजापूरच्या रामदरा तलावात पडणार आहे.यासाठी पत्रकार बांधवांसमवेत काम कसे सुरू आहे हे पाहण्यासाठी तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कार्यक्रम आयोजित केला होता.हे काम अंतिम टप्प्यात आले असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असे प्रकार करणे योग्य नाही असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांना माझे सांगणे आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेला हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत.तालुक्यातील जनता या सर्व प्रकारास ओळखून आहे.तालुक्यातील,जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची यांना एवढीच काळजी आहे तर कोणत्या योजना आणि कोणते प्रकल्प आजवर यांनी जिल्ह्यातील नागरिकांसाठी आणले हे यांनी जाहीरपणे सांगावे.शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या या कामात पुन्हा ढवळाढवळ करु नये असे माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या