Ticker

6/recent/ticker-posts

समाजसेवक संजय नाना शितोळे यांच्या पत्नी दीक्षा उर्फ विश्रांती शितोळे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक — सिंदफळ गटातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार?

 


प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर:धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध गटांतून इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी जाहीर करत गाठीभेटी,चर्चासत्रे आणि रणनीती बैठका सुरू केल्या आहेत.


या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ जिल्हा परिषद गटातून समाजसेवेच्या माध्यमातून ओळख निर्माण करणाऱ्या संजय नाना शितोळे यांच्या पत्नी दीक्षा उर्फ विश्रांती संजय शितोळे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे स्थानिक राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे.


संजय नाना शितोळे हे तुळजापूर तालुक्यातील दलित,वंचित व सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने आवाज उठवणारे,आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जाग आणणारे समाजसेवक म्हणून ओळखले जातात.त्यांनी अनेक वेळा जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आंदोलन केले असून,सामान्य नागरिकांच्या अडचणीसाठी लढा देण्याचा त्यांचा ठाम पवित्रा कायम राहिला आहे.


दीक्षा उर्फ विश्रांती शितोळे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त करत “जनतेचा आवाज जिल्हा परिषदेत” अशी घोषणा देण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान,दीक्षा उर्फ विश्रांती शितोळे कोणत्या पक्षाच्या तिकिटावरून निवडणूक लढवतात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.मात्र,संजय नाना शितोळे यांच्या सामाजिक कार्यामुळे आणि त्यांच्यावरील जनतेचा विश्वास पाहता कोणताही पक्ष त्यांना उमेदवारी देण्यास उत्सुक राहील,अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.


सिंदफळ जिल्हा परिषद गट हा राजकीयदृष्ट्या नेहमीच चर्चेत राहिलेला गट असून,या गटात नव्या नेतृत्वाची चुणूक दाखवणाऱ्या दीक्षा उर्फ विश्रांती शितोळे यांच्या प्रवेशामुळे आगामी निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

सिंदफळ जिल्हा परिषद गटातून दीक्षा उर्फ विश्रांती संजय शितोळे यांच्या उमेदवारीमुळे तुळजापूर तालुक्याच्या राजकारणात नवा रंग भरला आहे. दलित,वंचित व सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या शितोळे दांपत्याची जोडी आता राजकीय पातळीवर काय चमत्कार घडवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या